फळे-फुले, बेलपत्र, उपवासाच्या पदार्थांना अधिक मागणी : साबूदाणे, शेंगदाणे, खजूर दरामध्ये वाढ

बेळगाव : महाशिवरात्रीसाठी बाजारात विविध वस्तुंना मागणी वाढली होती. विशेषत: शेंगदाणे, साबूदाणे, वरीतांदूळ यासह फळा-फुलांना आणि बेलपत्रीची खरेदी वाढली होती. मात्र शेंगदाणे, केळी आणि फळांच्या दरात वाढ झाल्याने भाविकांचा उपवास कडक होणार आहे. बाजारात साबूदाणे 70 ऊ. किलो, वरीतांदूळ 110 ऊ., खजूर 100 ऊ. किलो, राजगिरा लाडू 20 ऊ. पाकिट, शेंगदाणे 140 ऊ. किलो असा दर आहे. मात्र महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी यांची मागणी वाढली आहे. याबरोबर अननस 80 ऊ. एक, पेऊ 80 ते 100 ऊ. किलो, चिक्कू 100 ऊ., संत्री 80 ते 100 ऊ., सफरचंद 140 ते 200 ऊ., केळी 50 ते 60 ऊ. किलो, द्राक्षे 60 ऊ. किलो, कलिंगड 60 ते 70 ऊ. एक असा फळांचा दर आहे. शिवाय पाच फळे 100 ते 120 ऊपयाला विकली जात आहेत. महाशिवरात्रीसाठी फळांनादेखील पसंती दिली जात आहे. बाजारात महाशिवरात्रीच्या खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासून वर्दळ पहायला मिळाली. फुले, हार, बेलपत्र यासह फळे आणि उपवासाच्या पदार्थाची खरेदी झाली. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ बहरलेली पहायला मिळाली. शिवरात्रीनिमित्त विविध मंदिरातून धार्मिक कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे किराणा वस्तुंनादेखील मागणी वाढल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवड्यात यात्रांमुळे बाजारपेठ थंडावली होती. मात्र महाशिवरात्रीसाठी पुन्हा बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठही बहरताना दिसत आहे. किराणा, फळविव्रेते आणि हार, फूल विव्रेत्यांकडेदेखील वर्दळ वाढलेली पहायला मिळाली.









