गिर्यारोहकांना विकले जातात स्नॅक्स
जर एखादे दुकान 393 फुटांच्या उंचीवर असेल तर तुम्ही तेथे सामग्री खरेदी करण्यासाठी जाल का? होय असे उत्तर देण्यापूर्वी तुम्ही कदाचित शंभरवेळा विचार कराल. अशाच प्रकारचे एक दुकान चीनमध्ये असून ते 393 फुटांच्या उंचीवर एका शिखराच्या मध्यभागी लटकलेले आहे. हे दुकान लोखंडी क्लॅप्सच्या मदतीने त्या शिखरावर टांगण्यात आले आहे. या स्टोअरला जगातील सर्वात ‘असुविधाजनक’ दुकान ठरविण्यात आले आहे. स्वत:च्या अनोख्या लोकेशनमुळे या स्टोअरची छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे दुकान चीनच्या हुनान प्रांतात असून ते लाकडाद्वारे तयार करण्यात आले आहे. हे दुकान एका शिखराच्या मध्यभागी टांगलेल्या स्थितीत आहे. या दुकानातून शिनिउझाई नॅशनल जियोलॉजिकल पार्कमध्ये गिर्यारोहक स्नॅक्स इत्यादीची खरेदी करत असतात. गिर्यारोहकांना या दुकानातून बाटलीबंद आणि स्नॅक्स इत्यादी वस्तू मिळतात. बॉक्सच्या आकारातील या दुकानात केवळ एकच कामगार तैनात असतो.
या स्टोअरची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत. छायाचित्रे शेअर झाल्यावर अनेक लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. या छायाचित्रांना आतापर्यंत 9 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर 7 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. अनेक लोकांनी यावर कॉमेंटही केली आहे.
हे एकाचवेळी अविश्वसनीय आणि वेडेपणा असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. या दुकानामागील कारणाची कुणी कल्पना करू शकत नाही, परंतु हे निश्चितच आश्चर्यजनक असल्याचे अन्य एका युजरने म्हटले आहे. आमच्या जीवनात प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते, भले मग ते कितीही अवघड का असू दे अशी टिप्पणी एका युजरने केली आहे.









