वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयातील शिलाँगमध्ये होणाऱ्या 2027 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीला रविवारपासून नेमबाजी चाचणी स्पर्धेने झाला. मेघालय नेमबाजी संघटनेने ही चाचणी नेमबाजी स्पर्धा आयोजित केली आहे.
देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला विशेष महत्त्व दिले जाते. दरम्यान 39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी शिलाँगला पहिल्यांदाच मिळाली आहे. या आगामी स्पर्धेमध्ये विविध राज्यातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात पदके मिळविण्यासाठी झगडत असतात. निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत विविध राज्यातील नेमबाजांनी आपला सहभाग दर्शविला.









