वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील सीआयए या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली असून या गोळीबारात एक व्यक्ती गंभी जखमी झाला आहे. गोळीबार मुख्यालयाच्या सुरक्षा सैनिकाकडून करण्यात आल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. मृत व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने मुख्यालयाचे संरक्षण करण्यासाठी त्याला गोळी घालण्यात आली, असे या गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे. तथापि, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेली ही अशी दुसरी घटना आहे. वॉशिंग्टन डीसी येथे इस्रायलच्या दूतावासावर झालेल्या गोळीबारात या दूतावासाच्या अधिकाऱ्यासह दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासांमध्येच व्हर्जिनियातील ही घटना घडली. या दोन घटनांचा संबंध आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला असून त्या संदर्भात चौकशी केली जात आहे. प्रथमदर्शनी या दोन घटनांमध्ये कोणत्याही संबंध नाही असे दिसत आहे. पण सर्व शक्यता गृहित धरल्या जात आहेत. जखमी झालेला व्यक्ती दहशतवादी आहे काय, याचीही चौकशी होत आहे.









