बर्लिन
जर्मनीच्या ब्राम्शे शहरात एका शाळेनजीक गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या घटनेदरम्यान हल्लेखोरही जखमी झाला आहे. सर्व जखमींना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मार्टिनुस्चुले स्कूलनजीक ही घटना घडली असली तरीही याचा शाळेशी कुठलाच संबंध नव्हता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.









