दोन ठार, 16 जखमी : एका आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ टाम्पा
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील टाम्पा शहरात दोन जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रविवारी हेलोवीन साजरा केला जात असताना एका इसमाने बार आणि क्लबच्या परिसरात गोळीबार केला होता. या गोळीबारात 16 जण जखमी झाले होते. तर दोन जणांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय टायरेल स्टीफन फिलिप्सला अटक केली आहे. हेलोवीन थीम पार्टी संपल्यावर लोक रस्त्यांवर एकत्र आले होते. याचदरम्यान गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 18-27 वयोगटातील लोक आहेत. काही लोकांच्या मदतीने संशयिताची ओळख पटविण्यास यश आले असून त्याला अटक देखील करण्यात आल्याची माहिती टाम्पा पोलीस प्रमुख ली बर्को यांनी दिली आहे.









