वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील कोलोरॅडो स्पिंग्स येथील गे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जण ठार तर 18 जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे कोलोरॅडो स्पिंग्समधील ‘क्लब क्मयू’ येथे हा हल्ला झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये क्लबबाहेरील रस्त्यावर रुग्णवाहिका उभ्या असलेल्या आणि मोठय़ा प्रमाणात पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद दल निदर्शनास येत आहे. 20 नोव्हेंबर रोजी दरवषी पाळल्या जाणाऱया ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबर्सच्या दिवशी हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर बंदुकधाऱयाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. धरपकडीदरम्यान हल्लेखोर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.