वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय नेमबाज क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारी महाराष्ट्राची माजी महिला ऑलिम्पिक नेमबाज तसेच भारतीय नेमबाज संघाची माजी प्रमुख प्रशिक्षक सुमा शिरुरचा आजीवन पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे सुमा शिरुरला 2025 चा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
येथे मुंबई जिमखान्याच्या प्रांगणामध्ये विश्वक्रीडा पत्रकार दिनानिमित्त आयोजिलेल्या समारंभामध्ये सुमा शिरुर तसेच महाराष्ट्राच्या दिपाली देशपांडे आणि अंजली भागवत यांच्या भारतीय नेमबाज क्षेत्रातील भरीव कामगिरीचे कौतुक करण्यात आले. 2016 पासून मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा प्रत्येक वर्षी गौरव केला जातो. 2016 साली भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावसकर यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.









