सोलापूर :
माजी महापौर मनोहर सपाटे यांनी एका महिलेवर केल्याच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाची आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेची बदनामी होत असल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि. २ जुलै) दुपारी १२.३० वाजता हॉटेल शिवपार्वती येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संतप्त मराठा समाजबांधवांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत, घटनेची सखोल चौकशी करून मनोहर सपाटे यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
तसेच, हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे असलेल्या समाजभूषण बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनावरून मनोहर सपाटे यांचे नाव हटवून भवनास बाबासाहेब गावडे यांचेच नाव देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात दिलीप कोल्हे, राजन जाधव, माऊली पवार, अनंत जाधव, विनोद भोसले, अमोल शिंदे, पुरुषोत्तम बरडे, सुनील रसाळे, किरण पवार यांच्यासह मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








