दोन्ही हॉटेल सील
साताऱ्यात सदर बझार येथील मदिना आणि बिस्मिल्ला या दोन हॉटेलमध्ये जनावरांचे मांस दिले जात असल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणल्यानंतर सातारा पालिकेच्या भरारी पथकाकडून या हॉटेलची तपासणी करण्यात आली.
दोन्ही हॉटेल मालकांकडे बीफचे मांस विक्रीचा कोणताही परवाना नसताना आणि हॉटेलमध्ये जनावरांचे मांस विक्रीला बंदी असताना या हॉटेलमधून मांस विक्री केली जात असल्याने सातारा पालिकेकडून दोन्ही हॉटेल सील करण्याची कारवाई करण्यात आली आहेत. याच परिसरात बेकायदेशीर कत्तलखाना असून या कत्तलखाण्यातून मांस या हॉटेलमध्ये पुरवले जाऊन ते विक्री केलं जात आहे. कत्तलखान्यातील मांस हे रस्त्यावर फेकल्यामुळे भटकी कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचे बोलले जात आहे.