कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाडिक गटाची प्रबळ ताकद असलेल्या गडमुडशिंगीमध्ये महाडिक गटाला माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. गडमुडशिंगी ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह सदस्य संजय सकटे, सरिता कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महाडिक गटाला रामराम करत पाटील गटात प्रवेश केला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गडमुडशिंगी येथील ग्रामपंचायत मध्ये महाडिक गटाची सत्ता होती. महाडिक गटावर नाराज होऊन सरपंच अश्विनी शिरगावे यांनी सदस्य संजय सकटे, सरिता कांबळे यांनी कार्यकर्त्यासह आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. हा महाडिक गटाला खूप मोठा धक्का मानला जातोय. यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून आता आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आलीय.









