२८ पर्यत नावे नोंदविण्याचे आवाहन
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक 1 ते 10 श्लोक, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गीताई 15 वा अध्याय 1ते 15 श्लोक पठण आणि आठवी ते दहावीच्या मुलांसाठी भगवत गीता 12 वा अध्याय 1 ते 10 श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
तीनही गटांमध्ये प्रत्येकी पहिला दुसरा तिसरा आणि उत्तेजनार्थ असे चार पारितोषिके देण्यात येणार आहेत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकानी आपली नावे तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर मोबाईल नं. 94058 27169,खजिनदार रामचंद्र कुडाळकर मोबाईल नं, 097-637-17761, वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे . कविता 094050 76736,दीपक नाईक मोबाईल नं. 94202 59680 वर किंवा कार्यालयामध्ये दि.२८ डिसेंबरपर्यंत नोंदवावी.नावे नोंदणीची तारीख चार दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे स्पर्धेचे परीक्षण मराठी आणि संस्कृतच्या शिक्षकांकडून केले जाणार असून या स्पर्धेमध्ये शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर आणि वृक्षवल्ली च्या वतीने प्रोप्रायटर विजय नाईक, सिद्धेश नाईक यांनी केले आहे या स्पर्धेचे उद्घाटन सन टीव्हीवरील प्रसिद्ध वेतोबा मालिकेतील भोळ्या मामा, मामी, शालग्या आणि बायो आदी कलाकार तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व पत्रकार अधिसूचिधारक समितीचे सदस्य गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना ५ जानेवारी २४ ला पारितोषिक वितरण वेतोबाच्या भूमिकेतील उमाकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने करण्यात आले आहे.दि.२८ डिसेंबरपर्यंत नावे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.









