वार्ताहर /कणकुंबी
नुकत्याच झालेल्या लोंढा विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित शिवठाण येथील रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मुलांच्या हॉलीबॉल संघाने क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, रिलेत प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, कुमार नयन ईश्राणी, 200 मिटर नयन ईश्राणी प्रथम क्रमांक, कुमार शुभम गावकर द्वितीय क्रमांक, 1500 मीटर सुदेश नाईक प्रथम क्रमांक, प्रसन्ना शिरोडकर द्वितीय क्रमांक, लांबउडी प्रसन्ना शिरोडकर द्वितीय क्रमांक, उंच उडी सुदेश नाईक तृतीय क्रमांक, तिहेरी उडी प्रसन्ना शिरोडकर प्रथम क्रमांक, पांडुरंग सुतार तृतीय क्रमांक, भालाफेक, स्वयम आजरेकर तृतीय क्रमांक. मुलींच्या गटामध्ये कब•ाr प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे दिव्या शिरोडकर तृतीय क्रमांक, 3000 मिटर संपदा पाटील तृतीय क्रमांक, गोळाफेक दिव्या शिरोडकर प्रथम क्रमांक, उंच उडी वैष्णवी फठाण द्वितीय क्रमांक. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. ए. पाटील, क्रीडा शिक्षक पि. टी. चोपडे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









