उद्धव ठाकरे गटाबरोबर असलेल्या सर्व आमदारांना शिवसेना पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन करावे लागणार आहे अन्यथा त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेनेचे नेते भारत गोगावले यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटातील इतर आमदारांबरोबरच हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही लागू असेल असे म्हटले आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले म्हणाले, “उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी नियमानुसार आमचा व्हिप पाळावा. ठाकरेंनी पक्षाचे चिन्ह आणि नाव गमावले आहे. 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आम्ही व्हीप जारी करणार आहोत. जर त्यांनी त्याचे पालन केले नाही तर त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे लागेल. काही दिवसापूर्वी ते आमच्या मागे लागले होते, आता आम्ही त्यांच्या मागे लागू.”
पुर्वीच्या शिवसेनेचे एकूण 56 आमदार असून त्यापैकी 40 आमदार आता शिंदे गटाकडे आहेत. 19 पैकी 13 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








