धनुष्यबाणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असल्याने पुढील सुनावणी शुकवारी होणार असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे धनुष्यबाणचे चिन्ह शिंदे गट की उध्दव ठाकरे यांना मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे. अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद मांडण्यासाठी अजून दोन तास मागितल्याने सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती समोर आली आहे.
बंड केलेल्यांच्या एबी फॉर्मवर उध्दव ठाकरेंची सही आहे. शिवसेनेच्या चिन्हावरच बंड केलेले निवडून आले होते. काही आमदार पक्षातून गेले आहेत, पक्ष जागेवरच आहे. त्यामुळे पक्षात फुट पडल्याची अफवा पसरु नका. सर्वाेच्च न्यायालयात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देण्यास घाई करु नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयोगाच्या निर्णयानंतर दिली.
शिंदे गटाचे आमदार आणि खासदार, ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते, ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केलं. त्यामुळे आमदार आणि खासदाराची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेत त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा ही कपिल सिब्बल यांनी केला.
कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत असा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला. निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून 23 लाख कागदपत्रे तर शिंदे गटाकडून चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








