Maharashtra Politics : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुरक्षा पुरवू नका असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना सांगितलं होतं, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मनमाड दौऱ्यावर असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचं खासगी वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर राजीनामा देण्यास तयार आहोत असंही म्हटलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? याउलट जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झे़ड प्लस सुरक्षा का देण्यात आली? असा सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला भाजपा-शिवसेना युतीवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांनी निवडून दिलं.उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यास तयार आहे, पण त्याआधी आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवतो असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
हेही वाचा- तरुण भारतचे वृत्त ठरले खरे; चंदगडातील शिवसेना शिंदे गटात सामील
आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे आतापर्यंत एकदाच मनमाडला आले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असं आव्हान यावेळी त्यांनी केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








