मुंबई प्रतिनिधी
भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा बाळगून असला तरी शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्याने युतीतच लोकसभेच्या जागांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासूनच लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतफत्वाखाली विरोधी गट इंडिया आघाडी करत एकत्र आले आहेत. भाजपने सुद्धा एनडीए अंतर्गत विविध पक्षांची मोट बांधली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विऊद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधला प्रत्येकी एक गट महाविकास आघडी आणि महायुतीमध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले अंदाज वर्तवणे काठी आहे. त्यातच महायुतीमध्ये जागा वाटपावऊन रस्सीखेच होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप 45 पेक्षा अधिक जागांची अपेक्षा ठेवून आहे. त्या जागा महायुतीच्या की स्वत:च्या याबाबत त्यांनी स्पष्टोक्ती केलेली नाही. पण शिंदे गटानेही आपले अस्तित्व दाखवायला सुऊवात केली आहे. शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केला आहे. 22 जागांवर शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. उर्वरित जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा कऊन निर्णय घेऊ असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अजून दावा केलेला नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सुद्धा आहे. त्यांनी आपला जागांचा दावा केला की महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या अपेक्षा स्पष्ट होतील. त्यानंतर तिन्ही पक्षात जागांचे वाटप करताना मोठी रस्सीखेच हीण्याची शक्यता आहे.








