शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla ) यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांना नेता म्हणून मंजुरी द्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान या खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
शिवसेनेकडून (Shivsena) सोमवारी सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, संसदेत गट नेते म्हणून विनायक राऊत यांची नियुक्ती केली आहे. पक्षापासून वेगळे झालेल्या गटाच्या कोणत्याही अर्जावर विचार करू नये अशी विनंतीसुद्धा केली होती. शिवसेनेचे ससंदीय गट नेते राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं होतं. तसंच राजन विचारे हे मुख्य प्रतोद असल्याचंही सांगितलं होतं.
हेही वाचा- CM शिंदेंची १२ खासदारांनी घेतली दिल्लीत भेट; संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील
दरम्यान, लोकसभा सचिवालयाकडून शिंदे गटाला सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेच्या गटनेतीपदी शेवाळेंच्या नियुक्तीसंदर्भात खासदारांच्याही सह्या घ्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षप्रतोद भावना गवळींच्या नावानं पत्र देण्याच्या सूचना देण्यातं आल्या आहेत. लोकसभेच्या गटनेतेपदी शेवाळेंच्या नियुक्तीबाबत शिंदे गटाचं पत्र जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंच्या घरी जाणार आहेत. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी वकिलांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Previous ArticleCM शिंदेंची १२ खासदारांनी घेतली दिल्लीत भेट; संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील
Next Article चिखले धबधब्यावरील अवैध वसुली थांबवली !








