वार्ताहर/उचगाव
बेनकनहळ्ळी येथील द.म.शि. मंडळ संचालित शिवराज हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते आकाशात कबुतरे सोडून झाले.अध्यक्षस्थानी एसडीएमसीचे अध्यक्ष नारायण पाटील होते. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थिनींच्या स्वागतगीतेन कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बी. पी. काटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन बाबाजी देसुरकर, महादेव पाटील यांनी केले. कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हास्तरीय खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योती फिरवून माजी विद्यार्थी सैनिक लखन अर्जुन पाटील आणि जोतिबा देसुरकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खेळाडूंना शपथ दिली. रमेश तुडयेकर, सुनील खांडेकर, युवराज पाटील, माऊती पाटील, प्रभाकर देसुरकर, जोतिबा पिसाळे, तुळसा पाटील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजन झाले. शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.









