वार्ताहर/उचगाव
बेनकनहळ्ळी येथील द. म. शि. मंडळ, बेळगाव संचलित बेनकनहळीच्या शिवराज हायस्कूल मधील हर्षद माऊती पाटील याची कराटे या स्पर्धेत राज्य पातळीवर तर आनंद जाधवची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेळगाव जिल्हा पातळीवरील कराटे 40 किलो गटात प्रथम क्रमांक पटकाविला व त्याची राज्यपातळीवर निवड झाली आहे. आनंद यल्लाप्पा जाधव याची क्रिकेट स्पर्धेत विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या बेळगाव जिल्हा क्रिकेट संघातून याची निवड झाली. याबद्दल दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. पाटील व शिक्षक वृंद शाळा, सुधारणा मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडाशिक्षक एस. टी. तारिहाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.









