प्रतिनिधी / म्हापसा
शिवोली येथे सलग साजरे होणारे सांजाव शनिवार दि. 24 रोजी मोठ्या उत्साहाने साजरे होणार आहे. यंदा सलग 30 व्या वर्षी येथे हे सांजाव साजरे करण्यात येणार असून या सांजावमध्ये यंदा 10 आकर्षक होड्या सजवून भाग घेणार असून विजेत्यांना यंदा सोन्याची नाणी बक्षीस स्वऊपात देण्यात येणार आहे. अशी माहिती शिवोली सांजाव समितीचे अध्यक्ष सिल्वेस्टर फर्नांडिस यांनी शिवोली येथे सांजाव स्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुढे बोलताना सिल्वेस्टर फर्नांडिस म्हणाले की, आम्ही सांजावसाठी कमिटी तयार केली आहे. गेली 30 वर्षे आम्ही एकत्रित आहोत. आमच्यात काहीच भेदभाव नाही. सर्व बरोबरीने हा उत्सव साजरा करतो. यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत प्रेक्षक वर्गाचा मोठा सहभाग आहे. मागील चार वर्षे कोविडने गेली. यंदा पाच ते सहा हजार प्रेक्षक वर्ग अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदा पाऊस अद्याप नाही मात्र तो आमच्यावर कृपादृष्टी करणार असे ते म्हणाले.
सांजाव होड्यांचा उत्सव
कारेश्वर डिसौजा यावेळी म्हणाले की, सांजाव हा मुळात होड्यांचा महोत्सव आहे. पावसात पाण्यात सोडून रंगेबिरंगी होड्यांचा आनंद प्रेक्षक वर्ग येथे घेताना पहायला मिळते. बोटी नाही तर सांजाव होत नाही. बाकी करमणूक होते की व्यासपीठावर. बोटीना रोख तसेच आकर्षक सोन्याची नामी देतात. यंदा कन्नड अभिनेता एस्टर नोरोन्हा, राजकीय अभिनेता फ्रान्सिस द नुवे, फोक डान्स, कोकणी अभिनेता अमरीश कामत, जॉनी, लुईस वन मेन बॅण्ड आदी उपस्थित राहणार आहे. येथे उत्कृष्ट कपेल सजावट कनिष्ठ वरिष्ठ गटात स्पर्धा होणार आहे. या सांजावासाठी एकूण आम्हाला 4 लाख ऊपये खर्च येतो असे ते म्हणाले. हडफडे, बादे, वाडी, मार्ना, वागाथोर, हणजूण आदी ठिकाणाहून येथे बोटी स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतात.
शिवोलीत दारूचे प्राशन होत नाही
दुपारी 3.30 वा. कार्यक्रमाला सुऊवात होते. या सांजावाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे आम्ही दारू कुणालाही देत नाही. इतरत्र सर्वत्र दारूचे प्राशन करतात. अशी माहिती एल्सन फर्नांडिस सचिव यांनी दिली. आम्ही कुठल्याच संस्थेची देणगी घेत नाही. यापूर्वी दयानंद मांद्रेकर, विनोद पालयेकर, मिकी पाशेको आणि आता डिलायला लोबो यांची मदत लाभली असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी एडगर फर्नांडिस, गिलसन गामिस, काराशुअल एलीसन, पॅट्रीक फर्नांडिस, सेल्वीन फर्नांडिस उपस्थित होते.









