कसबा बीड / वार्ताहर
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, ते चाफोडी तसेच कसबा बीड परिसरातपारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.शिवजयंती हा एकदम जिव्हाळ्याचा उत्सव म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो.आबाल वृद्धापासून मोठ्या पर्यंत शिवजयंती साजरी करायची उत्सुकता असते.ढोल ताशाच्या गजरात,लेझीम व पारंपारिक वाद्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन करत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी विविध स्पर्धा घेऊन तर काही ठिकाणी रक्तदान करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
कसबा बीड येथे संयुक्त मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. शिरोली दुमाला येथे तीन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये गावातल सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन व विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.शिरोली दुमाला येथील गावच्या मध्यभागी ध्वजाचा अनावरण सोहळा पार पडला या प्रसंगी शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण पाटील तुळशी समूहाचे अध्यक्ष मा. उपसरपंच श्री. सरदार पाटील ज्ञानु सुबराव पाटील सोसायटी चे संचालक रामचंद्र पाटील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष श्री.विश्वास पाटील शिरोली दुमाला ग्रा.पं सरपंच श्री. सचिन पाटील उपसरपंच श्री. कृष्णात पाटील सदस्य. सूरज पाटील.सागर घोटन.प्रशांत पाटील.शिवाजी कांबळे. बा.पू.पाटील विद्यालय.केंद्र शाळा. एकनाथ विद्यालय विद्यार्थी शिक्षक तसेच गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
एकंदरीत पाडळी खुर्द ते चाफोडी भागात अत्यंत उत्साहात व पारंपारिक वाद्याच्या सह्यायाने पाडळ खुर्द ते चाफोडी भागात शिवजयंती साजरी करण्यात आली.









