धनराज गुप्ता पहिले उपविजेता, जॅक्सन के. दुसरा उपविजेता, मणिपूरला सांघिक विजेतेपद, महाराष्ट्र उपविजेता
बेळगाव : छत्तीसगड येथे इंडियन बॉडीबिल्डींग अॅण्ड स्पोर्टस फेडरेशन आयोजित 15 व्या ज्युनिअर, मास्टर्स, दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धेत झारखंडचा शिवचंद्रन सुनदी याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पहिले उपविजेते मणिपूरच्या धनराज गुप्ताने तर जॅक्सन के ने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. सांघिक गटात 295 गुणांसह मणिपूरने विजेतेपद, 240 गुणांसह महाराष्ट्राने उपविजेतेपद तर 195 गुणांसह पश्चिम बंगालने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. मणिपूरच्या धनराज गुप्ताने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.झारखंड येथे झालेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेत आयबीबीबीएफच्या मान्यतेनुसार खालील वजनी गटात स्पर्धा घेण्यात आल्या.
- ज्युनिअर गट 55 किलो 1) शिवचरण सिंग – झारखंड 2) दिनेश मंगम-आंध्रप्रदेश 3) मियासाद- उत्तराखंड 4) एस. रोहित मणिपूर 5) अजय विजय संगपाल- महाराष्ट्र.
- गट 60 किलो 1) रामलिंगम मुखलान-तामिळनाडू 2) सोमजित दत्ता- आसाम 3) शरीफ मोहम्मद -दिल्ली 4) सोजित दोरी-प. बंगाल 5) योगेशसिंग अधिकारी- पंजाब.
- गट 65 किलो 1) अतुल व्ही. एस.-केरळ 2) प्रसांजित घोष-प. बंगाल 3) असिम अन्सारी -राजस्थान 4) चैतन्य सिंगल- उत्तराखंड 5) दिलीपकुमार उपयाल-आंध्रप्रदेश.
- गट 70 किलो 1) धनराज गुप्ता-मणिपूर 2) भूषण दत्ता गारू-दिल्ली 3) शिवप्रयाण एस-तामिळनाडू 4) शक्तीकुमार एन. सी.-केरळ 5) विनित विवेक हणमशेठ बेळगाव- कर्नाटक.
- गट 75 किलो 1) जॅक्सन के. मणिपूर 2) युमन थॉमस-मणिपूर 3) मनोज उत्तराखंड-उ. प्रदेश 4) पियुशराज-बिहार 5) सर्वेश गोस्ती- महाराष्ट्र.
- 75 वरील किलो गट 1) रेकी हवाईबंब-मणिपूर 2) रोहित यादव-हरियाणा 3) साई तरुणकुमार कांतम-आंध्रप्रदेश 4) नवज्योतसिंग लिमाजान -मणिपूर 5) बिटूशहा- झारखंड.
यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर झालेल्या ज्युनिअर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबासाठी शिवचरणसिंग, रामलिंगम, अतुल व्ही. एस. धनराज गुप्ता, जॅक्सन के व रिकी हवाईबंब यांच्यात लढत झाली. त्यामध्ये शिवचरणसिंग, धनराज गुप्ता व जॅक्शन के यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये शिवचरणसिंगने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला.
- मास्टर गटात 50 ते 60 वर्षांवरील 80 वरील किलो गट 1) विठ्ठल मोहनदास – केरळ 2) उदयन एम. तामिळनाडू 3) साजी के. आर.-केरळ 4) सतीश भंडारी-उत्तराखंड 5) सुशांतकुमार जेना-ओडिसा. 80 खालील किलो गट 1) संजय हरी बिस्ता-महाराष्ट्र 2) राजेश जैस्वाल-हरियाणा 3) अय्याप्पा राही-तामिळनाडू 4) उमरजित मैत्री-मणिपूर 5) पॅक्ट्रीक मोहन जॉन-तेलंगणा.
- खुला गट-उत्तम घोष-प. बंगाल, मणिकलाल दास-प. बंगाल, मनोजदास-ओडिसा, सुखवेंद्रसिंग सानी-गुजरात, जयरामन शनगुम-तामिळनाडू. 60 किलोवरील गटात दिव्यांग गट- 1) प्रथमेश भोसले- महाराष्ट्र, रविंद्र कदम-महाराष्ट्र, बलराम हरियाणा, सूर्यनारायण ई. तामिळनाडू, महेंद्रकुमार यादू छत्तीसगड. 60 किलो खालील गटात 1) फिरोज सेक-महाराष्ट्र 2) गौरव पटेल-छत्तीसगड 3) धर्मेंद्रदास – छत्तीसगड 4) के. व्यंकटरामण्णा-तेलंगणा, 5) दुष्यंतकुमार दुर्वा-छत्तीसगड.
- मास्टर्स 80 किलो वरील गटात-1) आर्नाड सिंग कुतीजाम- मणिपूर 2) राजू साहू – मध्यप्रदेश 3) रिंकूदास आसाम 4) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव- कर्नाटक 5) जॉनी डिसोजा-गोवा.
- 80 किलो आतील गटात 1) दिलीपकुमार रॉय प. बंगाल 2) गोपालकुमार महाराष्ट्र 3) रितेश शहा प. बंगाल 4) श्रवण जयराम तामिळनाडू 5) उमाकांत माळवी मध्यप्रदेश यांनी विजेतेपद पटकाविले.









