अॅड. शिवाजी देसाई यांचे 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्dयात व्याख्यान
वाळपई : छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांनी अपल्या काळात लोकशाही तत्त्व अवलंबले आणि एका वेगळ्या लोकप्रिय राजनीतीची स्थापना केली आणि म्हणूनच आजच्या कालखंडातदेखील शिवरायांची राजनीती राजकारणात असणे तितकेच आवश्यक आहे. कारण त्यांच्या स्वराज्याची निर्मिती ही लोकशाही तत्वावर होती, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते अॅड. शिवाजी देसाई यांनी मोर्ले सत्तरी येथे केले. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘शिवचरित्र’ विषयावर प्रमुख वत्ते या नात्याने बोलताना केले. याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते भानुदास जोशी, शिवाजी राणे, प्रतिभा मराठे, समीर गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड. शिवाजी देसाई पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभे केले त्याकरिता एक योजना कार्यान्वित केली. आणि या योजनेमध्ये त्यांच्या आईचा आणि वडिलांचा समावेश होता. स्वराज्य निर्माण करताना शिवरायांनी स्वत:विषयी जनतेमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण केला. स्वत:चे चारित्र्य शुद्ध ठेवले. आणि यामुळे रयतेमध्ये शिवराया विषयी एक विश्वास निर्माण झाला. अनेक मावळे स्वराज्यासाठी मरायला तयार झाले. स्वराज्य उभे करायला परिस्थिती अनुकूल नव्हती. अनेक अडचणी, अनेक पातशाह्या समोर उभ्या होत्या. युद्धाची सामग्री, माणसे देखील मोठ्या प्रमाणात नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये शिवरायांनी सर्व अडचणी वरती मात करून लोकशाही तत्त्व स्वीकारून स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांच्या राजनीतीचा अभ्यास आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती केला जात आहे.
भारतीयांनी जर पुढे जायचे असेल तर अन्य कुणाचाही इतिहास सोडून फक्त शिवरायांचा इतिहास वाचला पाहिजे. प्रत्येक भारतीयाला शिवराय म्हणजे काय हे समजले पाहिजे. कारण शिवरायांनी भारतीयांना सामर्थ्याची, आत्मसन्मानाने जगण्याची शिकवण दिली. आज खरे म्हणजे छत्रपती शिवराय हे प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत, समजले पाहिजेत. कारण भारताला विश्वगुरू बनविण्याची ताकद शिवरायांच्या विचारात आहे असे अॅड. शिवाजी देसाई शेवटी म्हणाले. याप्रसंगी भानुदास जोशी आणि शिवाजी राणे यांनी विचार मांडले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुऊवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून अॅड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्र निवेदन समीर गोवेकर यांनी केले. त्यांनीच आभार मानले. शेवटी शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
जयंतराव सहस्रबुद्धे यांना श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुऊवातीला विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री स्व. जयंतराव सहस्रबुद्धे यांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अॅड. देसाई म्हभारताच्या मातीतून ऊजलेले विज्ञान संपूर्ण जगाला आणि भारतीयांना समजावे म्हणून त्यांनी अखंड प्रयास केले, त्याकरिता प्रचंड प्रवास केला, अशी माहिती दिली.









