पाटणा :
बिहार शाळा परीक्षा मंडळाने (बीएसईबी) रविवार, 31 मार्च दुपारी 1:30 वाजता मॅट्रिक (दहावी) बोर्ड परीक्षेचा निकाल 2024 प्रसिद्ध केला आहे. संपूर्ण राज्यात ‘टॉप टेन’मध्ये 51 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा शाळा पूर्णियाच्या शिवांकर कुमारने 500 पैकी 489 म्हणजेच 97.80 टक्के गुण मिळवले आहेत. बिहार बोर्ड मॅट्रिक परीक्षा 2024 साठी बसलेल्या एकूण 16 लाख 64 हजार 252 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 79 हजार 542 जण उत्तीर्ण झाले आहेत. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 82.91 टक्के आहे. गेल्यावषीच्या तुलनेत यंदाचा निकाल थोडा चांगला लागला आहे. 2023 मध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 81.04 टक्के होते. 2017 मध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वात कमी 50.12 टक्के होते. बिहार बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा 15 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.









