वृत्तसंस्था/ पुणे
येथील सावित्रीबाई फुले कॉलेजच्या मैदानावर झालेल्या इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत 20 वर्षीय भालाफेकधारक शिवम लोखारेने 80 मी. चा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा तरुण भारतीय भालाफेकधारक आहे.
भालाफेक प्रकारात शिवमने 80.95 मी. ची नोंद करत बक्षीसादाखल ठेवलेल्या स्पोर्ट्स दुचाकी वाहनाचा मानकरी ठरला. भारताचा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकधारक नीरज चोप्राने आपल्या वयाच्या 18 व्या वर्षी या क्रीडा प्रकारात 80 मी. चा टप्पा ओलांडला होता. यानंतर कमी वयात अशी कामगिरी करणारा शिवम लोकरे दुसरा भालाफेकधारक ठरला आहे.









