बेळगाव : टेन्वीक स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटातून शिवाली पुजारी, मिना मिसाळ यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून दुहेरी मुकूट पटकाविले. संघीक गटात डीपी, केएलई इंटरनॅशनल, केएलई गोकाक, सेंटपॉल्स संघानी विजेतपद पटकाविले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,
14 वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवाली पुजारी डीपी हिने श्रीनिधी उप्पीन गोकाक हिचा 11-4, 11-9, 11-4 अशा सेटमध्ये तर मुलांच्या गटात निनाद मिसाळ केएलई इंटरनॅशनलने अमेय सिद्धण्णावर जैन हेरीटेजचा 11-8, 11-5, 13-11 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
17 वर्षाखालील गटात मुलींच्या एकेरीत शिवाली पुजारीने तुलसी ए, कित्तूर सैनिक स्कूल हिचा 11-5, 11-7, 11-1 अशा सेटमध्ये तर मुलांच्या अंतिम सामन्यात निनाद मिसाळने विहान मण्णूरकर सेंटपॉल्स याचा 11-6, 11-9, 7-11, 11-6 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात मुलींमध्ये डीपी हायस्कूलने केएलई गोकाक संघाचा 3-1 अशा सेटमध्ये पराभव केला. तर मुलांच्या गटात केएलई इंटरनॅशनल संघाने केएलई सीबीएसई चिकोडी संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील गटात केएलई गोकाक अ संघाने केएलई गोकाक ब संघाचा 3-1 अशा सेटमध्ये पराभव करून तर मुलांच्या गटात सेंटपॉल्सने केएलई इंटरनॅशनल संघाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहूणे उचगाव, सेंटप्रान्सिस स्कूलचे प्रा. फादर अन्ड्रोफिलिप्स, केएलईच्या प्राचार्य रूपाली कागे, प्रमुख पंच संजय कानडे, शुभम कानडे, सेजल कानडे आदींच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना व संघाना चषक प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.









