प्रतिनिधी,कोल्हापूर
Shivaji University Exam News : शिवाजी विद्यापीठ संलग्न तिन्ही क्षेत्रातील महाविद्यालये असणारी अनेक गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे. तसेच राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे आहे. एकूण पावसाचे वातावरण पाहता शिवाजी विद्यापीठातर्फे उद्या (दि. 28) होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेची तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तरी महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









