प्रतिनिधी,कोल्हापूर
Shivaji University News : भरड धान्य वर्षानिमित्त भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इट राईट मिलेट मेला’चे उद्घाटन वापकोथोन कार्यक्रमाने करण्यात आले.कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील,भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्र मुंबई जॉइंट डायरेक्टर के.के.जीथा, डेप्युटी डायरेक्टर के.यु. मेथेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या कार्यक्रमातून भरड धान्य जनजागृती करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांना नाचणीचा पिझ्झा देऊन भरड धान्याचे महत्त्व पटवून दिले.
भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्र मुंबई जॉइंट डायरेक्टर के.के.जीथा, डेप्युटी डायरेक्टर के.यु. मेथेकर, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील मार्गदर्शन करणार आहेत. फूड अॅन्ड टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ.एस.एन.सपली,डॉ. इराणा उडचाण, डॉ. उदयसिंह पाटील यांनी सुत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी डॉ.अलोक जत्राटकर यांनी आभार मानले.यावेळी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे असिस्टंट ज्योती हर्णे,टेक्निकल डारेक्टर देवांशी चावला,दादासाहेब विश्वास, अन्नविज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील,समन्वयक डॉ.इराण्णा उडचान,डॉ. गणेश शिंदे आदी उपस्थित होते.









