प्रतिनिधी,कोल्हापूर
Shivaji University Exam News : शिवाजी विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल-2023 परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. परंतू विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटनांनी परीक्षा मे महिन्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार मे महिन्याच्या अखेर परीक्षा घेण्यात येतील, या परीक्षांच्या तारखा येत्या काही दिवसात जाहीर केल्या जातील, याची नोंद विद्यार्थी, प्राध्यापक व पालकांनी घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
विद्यापीठ मार्च-एप्रिल 2023 उन्हाळी सत्रातील परीक्षा वेळेत झाल्या तर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण होवू नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थी हित लक्षात घेवून विद्यार्थी, पालक, प्राचार्य आणि शिक्षक संघटनांच्या मागणीचा मान ठेवत विद्यापीठ या परीक्षा लवकरच घेणार आहे. परीक्षेच्या नवीन तारखा विद्यापीठ लवकरच जाहीर करणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी त्यानुसार अभ्यासाला सुरूवात करावी, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









