शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि लेटरहेड असलेले परीक्षा रद्द झाल्याचे बनावट पत्र सोशल मिडियावर व्हायरल करून विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण करणाऱ्य़ांचा आता सायबर सेल तपास करणार आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती दिली. आज विद्यापीठात पत्रकार परिषद झाली यावेळी हि माहिती देण्यात आली.
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा विभागाचे संचालक अजितसिंह जाधव बोलताना म्हणाले, सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही बनावट पत्रावर विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयांची उलटतपासणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. जर कोणाला संशयास्पद पत्र आढळले तर विद्यापीठाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले.
तर शैलेश बलकवडे म्हणाले, आम्ही चौकशी सुरू केली असून समस्येच्या मुळापर्यंत जाणार आहोत. कोणत्याही अडथळ्याविना परीक्षा अचूकपणे पार पाडण्याची विद्यापीठाची ख्याती आहे. अशा घटना सर्व संबंधितांसाठी आव्हानात्मक आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









