प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : शिवाजी पार्क येथील नक्षत्र हाईट्समध्ये चोरटय़ांनी धुमाकूळ घालत 4 बंद फ्लॅट फोडले. एकाच फ्लॅटमधील 13 तोळे सोन्याचे दागिने, रोख 55 हजार असा सुमारे 5 लाख रुपयांच्या मुद्देमालवर डल्ला मारला. याबाबतची फिर्याद धनाजीराव शामराव पाटील (वय 58 रा. शिवाजी पार्क नक्षत्र हाईट्स) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची माहिती अशी,शिक्षक असणारे धनाजीराव पाटील हे दिवाळी सुट्टी निमीत्त कुटूंबासह मंगळवारी सकाळी बाहेर गावी गेले होते.मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी धनाजी पाटील यांच्यासह परिसरातील अन्य 3 बंद फ्लॅट लक्ष केले.पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरटय़ांनी 45 ग्रॅमचे पेंडल, 50 ग्रॅमचे सोन्याचे तोडे,15 ग्रॅमचा नेकलेस,10 ग्रॅमच्या सोन्याच्या कुडय़ा,5 ग्रॅमची सोन्याची अंगठी,5 ग्रॅमची सोन्याची रिंग,चांदीचा छल्ला,मोत्याची माळ,रोख 55 हजार रुपये असा सुमारे 5लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.तर त्याच मजल्यावर राहणारे सुनिल लक्ष्मणराव कित्तुर,जयवंत रामचंद्र गायकवाड, निर्मला चारुदत्त पाटील यांचे बंद फ्लॅटही चोरटय़ांनी लक्ष केले.त्यांच्याही फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला.
अधिक वाचण्यासाठी- Rankala: मुळात सुंदर असलेल्या रंकाळ्याला मेकअप….
बुधवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.त्यानंतर या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली.उपअधिक्षक मंगेश चव्हाण,निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले.अधिक तपास उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.
सिसीटीव्ही फुटेज ताब्यात
पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीघे संशयीत आढळून आले आहेत. यावरुन या घटनेचा तपास सुरु आहे. मध्यरात्री 1 ते 3 च्या सुमारास या चोरीच्या घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी शाहूपुरी परिसर लक्ष केले आहे.मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील बॅग लिफ्टींग, चेन स्नॅचिंगसह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









