विविध प्रकारात खेळाडूंचे यश
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित केलल्या कडोली विभागीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी हायस्कूल कडोली शाळेच्या खेळाडूनी घवघवीत यश संपादन करीत कडोली विभागीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शिवाजी हायस्कूल कडोलीच्या मैदानावर आयोजित केलेल्या कडोली विभागीय स्पर्धेत सिद्धार्थ रूटकुटेने 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, किशन चौगुलेने 400 मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, दक्ष पाटीलने 800, 300, 1500 धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, सारंग कडेमनीने व कुणाल मानगोडे यानी 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतिय क्रमांक, बुध्दीबळ व योगा स्पर्धेत साहिल पाटीलने प्रथम क्रमांक अडथळा शर्यतीत सिध्दार्थ रूटकुटेने प्रथम क्रमांक, कुस्ती स्पर्धेत नागेश अनगोळकर व रितेश कुट्रे यानी विजेतेपद, सांगिक खेळात मुलांच्या संघाने विजेतेपद, फुटबॉलमध्ये मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. मुली विभागात तनुजा मुतकेकरने वॉक्स स्पर्धेत प्रथम क्रमांक, मुलींच्या रिले संघाने प्रथम क्रमांक, योगा स्पर्धेत संचिता पाटील व वैष्णवी पाटील प्रथम क्रमांक, मुलींच्या कुस्तीस्पर्धेत श्रध्दा कासरने प्रथम क्रमांक तर मुलींच्या खो-खो, कब्बडी व थ्रो बॉल संघाने विजेतेपद पटकाविले. वरिल विजेत्या खेळाडू व संघाना क्रिडा शिक्षक एन. आर. पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे. तर मुख्याध्यापिका वर्षा पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









