क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब, डोनाल्ड डक किंडर गार्डन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी कॉलनी चषक आंतरशालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा सोमवार दि. 7 नोव्हेंबरपासून सुभाषचंद्र बोस (लेले मैदानावर) प्रारंभ होणार आहेत. विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. शिवाजी कॉलनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष पवन कांबळे होते.
शिवाजी कॉलनीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत राकेश कांबळे, सागर भोसले, श्रीकांत पाटील, संतोष दळवी, शिरीष चौगुले, सचिन धामणेकर, निलय दळवी, निनाद गोटखंडी, केतन गोलसे, श्रीधर गोलसे, दिलीप कोल्हापुरे, जयराम बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावषीपासूनच शिवाजी कॉलनी स्पोर्ट्स क्लबतर्फे होतकरु फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात भारतीय फुटबॉल संघटनेने महिला फुटबॉलपटूंना वाव देण्यासाठी राज्यात व जिह्यातून उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम शिवाजी कॉलनी क्लबमार्फत सुरू करण्यात आला आहे.
17 वर्षाखालील मुले-मुली व 14 वर्षांखालील मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, प्रमाणपत्रे व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी आपली नावे संतोष दळवी यांच्याकडे नोंदवावीत.









