ढोल-ताशांचा गजर, फटाक्मयांची आतषबाजी : शिवज्योतीच्या स्वागतासह व्याख्यानाचेही आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्मयांच्या आतषबाजीत दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जल्लोषात शिवजयंती साजरी झाली.
कोरे गल्ली शहापूर
कोरे गल्ली शहापूर येथे पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गल्लीतील पंच शांताराम गावडोजी, सागर हावळाण्णाचे, शिवाजी मजूकर, कल्लाप्पा हंडे, शिवाजी केरवाडकर, युवराज हावळाण्णाचे, मनोहर शहापूरकर, बंडू पाटील, नागेश शिंदे, रवी जाधव, भाऊ मजुकर, किरण पाटील, नागेश कुंडेकर, गजानन जाधव, महेश हावळाण्णाचे, अभिजीत मजुकर यासह मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
यश ऑटोतर्फे व्याख्यान
यश ऑटोतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र मुतकेकर व रणजित चौगुले यांनी ‘रयतेचा राजा छत्रपती’ या विषयावर व्याख्यान दिले. उद्योजक महादेव चौगुले यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी शिवसंत संजय मोरे, के. एन. पाटील, अरुण मोरे, विद्या पाटील, निलम ठोंबरे, रविंद्र
पाटील, दत्ता उघाडे, प्रतिभा घाडी, सुषमा मोरे, राधिका तरळे, येसुबाई घाडी यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गणेश उसुलकर यांनी कार्यक्रमस्थळी किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती.
भगवे वादळ, अनंतशयन गल्ली
अनंतशयन गल्ली येथील भगवे वादळ युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मंडळातर्फे आनंदगड येथून शिवज्योत आणण्यात आली. रेणुका महिला मंडळाच्या महिलांनी पाळणा म्हटला. यावेळी मयुरेश माळी, हरिष माळी, बाळू ताशिलदार, प्रसाद मोरे, मनोज तानवडे, चंद्रकांत माळी, शुभम पेडणेकर, तन्मय नाईक, रितेश माळी, निलेश हसबे, उमा नाईक, रेखा माळी, पार्वती माळी, शांता माळी, शुभम दोड्डण्णावर, कीर्ती नाईक यासह इतर शिवभक्त उपस्थित होते.
मंगाईनगर वडगाव
वडगाव मंगाईनगर येथे शिवभक्तांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. फकिरा पाटील व बंडू केरवाडकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सनी रेमाण्णाचे, किरण तरळेकर, अतुल सांबरेकर, विनायक अर्कसाली, निलेश केरवाडकर, चेतन पाटील, राजू पाटील, महेश हसबे, सूरज हजारे, स्वप्निल गोंधळी, सुमित उचगावकर, शिवा केरवाडकर, अभिजीत नाईक यासह इतर उपस्थित होते.
जनसेवादल
जनसेवादलाच्यावतीने शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष दीपक हळदणकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन झाले. यावेळी सागर लोहार, विठ्ठल पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.









