वार्ताहर/हिंडलगा
गणेशपूर (राकसकोप रोड) येथील यश ऑटोमोबाईल्स या ठिकाणी दि. 29 रोजी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मोरे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आनंद पाटील-संकपाळ, राष्ट्रपती सन्मानित चित्रकार व कोल्हापूर येथील नामवंत स्त्राrरोगतज्ञ डॉ. अल्पना चौगुले उपस्थित होत्या. याप्रसंगी राणोजी मोरे, रत्नोजी मोरे, कौशल्य मोरे या शिवप्रेमींनी शिवगर्जना केली. वैभवी मोरेने धर्मवीर संभाजी महाराजांवर आवेशपूर्ण भाषण केले. प्रारंभी तानाजी पाटील, देवयानी पाटील, हेमा घाडगे यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वर्षा खामकर यांनी स्वागतगीत सादर केले. उपस्थितांचे सुषमा संजय मोरे, अहिल्या मोरे, अरुणा मोरे यांनी मान्यवरांचे औक्षण केले.
रणजीत चौगुले यांनी प्रास्ताविक मनोगत व रविंद्र पाटील यांनी ‘शिवसंदेश भारत समूह’ यांच्या 28 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी उपस्थितांना राजमुद्रा अंगठी, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व आई जिजाऊंची प्रतिमा देवून मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आनंद पाटील-संकपाळ यांनी ‘शोध दोन सम्राटांचा : शहाजी-शिवाजी’ या विषयावर अभ्यासपूर्ण इतिहासदृष्टी समृद्ध विचारमंथन केले. यावेळी कोल्हापूरच्या रायगडचे वारकरी के. एम. पाटील, गुरुजी मिलिंद पाटील, डॉ. सोपान चौगुले यांचाही सन्मान केला. उपस्थित सर्व शिवप्रेमी डॉ. अल्पना चौगुले यांनी राज्याभिषेक चित्राची प्रत भेटस्वरुपात दिली. सूत्रसंचालन एल. पी. पाटील यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली. आभार के. एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला अॅड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, ईश्वर लगाडे, अजित यादव, प्राचार्य ए. एल. पाटील, दत्ताजी कानूरकर, संदीप तरळे व शिवप्रेमी उपस्थित होते.









