मराठी टिव्ही सृष्टीमध्ये सध्या लग्न सोहळ्यांची लाट आली आहे. टिव्हीवरील कलाकार एकामागोमाग एक लग्न करत आहेत.
‘शिवा’ फेम आशु म्हणजे सर्वांचा लाडका ‘शाल्व किंजवडेकर’ आणि पसर्नल ब्लॉगर ‘श्रेया डफलापूरकर’ यांचा विवाह सोहळा नुकताच थाटात पार पडला. त्यांच्या लग्न सोहळ्याचे क्षण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या सिरीयलनंतर शाल्व घराघरात पोहोचला. शाल्वची सोशल मिडीयावरची फॅन फॉलॉइंग पण मोठी आहे. तो सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतो.
शाल्व आणि त्याची गर्लफ्रेण्ड श्रेया डफलापूरकर यांनी २०२३ रोजी साखरपूडा केला होता. या दोघांचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाला प्रियंका बर्वे, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनीही हजेरी लावली.









