वार्ताहर/बाळेकुंद्री
पंत बाळेकुंद्री पंतनगर येथील क्षेमाभिवृद्धी रहिवाशांच्या वतीने बुधवारी शिव-बसव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रायाप्पा हट्टी, निवृत्त पोलीस अधिकारी शंकरानंद मदीहळी उपस्थित होते. शिवबसवजयंतीनिमित्त मान्यवरांनी संत बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावचित्राला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. गुरु कोतीन, महिला व विविध समाजांच्या मान्यवरांनी विधिवत पूजनाव्दारे पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रायाप्पा हट्टी म्हणाले की, नागरिकांनी महात्मा बशवेश्वरांच्या विचारांचे पालन केले. तर खऱ्याअर्थाने त्यांची जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल, असे सांगितले. यावेळी बी. एल. तिनगी, नागप्पा दास्तीकोप्प, महेश रूद्रगौडर, बसवराज वक्पुंद, ललिता भट्ट, कल्पना यल्लपनावर, राजेश सोगला, अडवेप्पा मल्लनावर व महिलावर्ग उपस्थित होता.









