प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने आज (25 जून) रोजी सायंकाळी 4 वाजता शिव शाहू सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून, काही मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत हा बदल लागु राहणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही नेमण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.
या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविली
– जुने ट्रॅफिक ऑफिस येथुन सीपीआर हॉस्पीटल चौकाकडे जाणारी वाहतुक दसरा चौक मार्गे व्हिनस कॉर्नर किंवा बिंदु चौक मार्गे पुढे मार्गस्थ
– शनीवार पेठ पोस्ट ऑफिस कडे येणारी वाहतुक बुरुड गल्ली येथे बंद करणेत येत असुन ही वाहतूक पापाची तिकटी किंवा सोन्या मारुती चौकाकडून मार्गस्थ होईल
– मणेर मस्जिद कोल्हापूर महानगरपालिका चौक मार्गे माळकर सिग्नल कडे येणारी वाहतुक सोन्या मारुती चौक मार्गे पुढे मार्गस्थ
– सोन्या मारुती चौकाकडुन मणेर मस्जिद कडे येणारी वाहतुक पापाची तिकटी किंवा शुक्रवार पेठ मार्गे पुढे मार्गस्थ
– महाद्वार रोडवरील भेंडे गल्लीतुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणारी वाहतुक पापाची तिकटी मार्गे पुढे मार्गस्थ
– महाद्वार रोडवरील गुजरी व जोतीबा रोडवरुन भाऊसिंगजी रोडवरुन छत्रपती शिवाजी चौकाकडे येणारी वाहतुक भवानी मंडप जेल रोड मार्गे पुढे मार्गस्थ
– व्हिनस कॉर्नर येथून दसरा चौकाकडे जाणारी वाहतुक फोर्ड कॉर्नर किंवा कोंडा ओळ मार्गे मार्गस्थ
– रंकाळा स्टॅन्ड कडुन माळकर तिकटीकडे येणारी सर्व वाहतुक गंगावेश येथुन रेगे तिकटी, शुक्रवार गेट पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज पुल येथून मार्गस्थ
– बिनखांबी गणेश मंदिर कडुन पापाची तिकटी कडे जाणारी वाहतुक महाद्वार चौक येथून ताराबाई रोडने पुढे मार्गस्थ
– आईसाहेब महाराज पुतळा व स्वयंभु गणेश मंदिर चौक कडुन महाराणा प्रताप चौकाकडे जाणारी वाहतुक बिंदु चौक अगर दसरा चौक मार्गे पुढे मार्गस्थ होईल
– बिंदु चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाकडे जाणारी वाहतुक मिलन चौक, स्वयंभु गणेश मंदिर मार्गे पुढे मार्गस्थ होईल
– छत्रपती शिवाजी महाराजपुला कडुन सीपीआरकडे येणारी वाहतुक छत्रपती शिवाजी महाराज पुल येथून शुक्रवार गेट, गंगावेश मार्गे पुढे मार्गस्थ होईल.
असा असेल बंदोबस्त
अपर पोलीस अधीक्षक – 1
पोलीस उपअधिक्षक – 1
पोलीस निरीक्षक – 8
पोलीस उपनिरीक्षक – 33
पोलीस कर्मचारी – 400
एसआरपीएफ तुकडी – 3









