शिवनसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आणि पक्षाचे शिवसेना हे नाव शिंदे गटाच्या पारड्यात निवडणुक आयोगाने टाकल्यावर शिंदे गटाकडून राज्यभरात जल्लोष साजरा होत आहे. ठाकरे गटाला बसलेल्या या धक्क्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर कडाडून टिका केली. तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
निवडणुक आयोगाचा निकाल बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवद साधला ते म्हणाले, ” या घटना घडणार हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं गेलं तसेच ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला आणि तो कुठपर्यंत झाला हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे….सत्याचा विजय नसून खोक्यांचा विजय आहे…आज श्रीरामाचा धनुष्यबाण रावणाला मिळाला. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी तसेच लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुणगे विकत घेत आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायच्या आधीच निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय करणारा आहे. तसेच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला ताब्यात घेण्यासाठीचा रचलेला फास असून माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही” असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
Previous Articleआजारपणात प्रचारात उतरवणे ही कसली माणुसकी?
Next Article रत्नागिरीत उद्या ‘हॅप्पी मॅरेथॉन’ 2023’चे आयोजन








