शिवसेनेच्या ‘शिवसंवाद यात्रे’ला (Shivsamvad Yatra) कोल्हापूरातील गडहिंग्लज (Gadhinglaj) तालुक्यातून सुरवात झाली असून शिवसेना ठाकरे गटाचे संजय राउत ( Sanjay Raut ) यांनी या यात्रेला सुरवात केली. शिवसेनेतील साडेतीन चोर पळाले त्यांच्या छाताडावर बसून कोल्हापूरात भगवा फडकवा असे आव्हान खासदार संजय राउत यांनी शिवसैनिकांना केले.
पहा LIVE >>>>> कोल्हापूर गडहिंग्लजमधून संजय राऊत करणार ‘शिवगर्जना’
जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी या वाघांना वाढवले. पण ते कातड्यासकट पळून गेले आहेत. कोल्हापुरातीलही साडेतीन चोर पळाले. आता त्यांच्या छाडावर बसून शिवसेना भगवा कोल्हापुरात फडकवा. आणि हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.” असे आवाहन त्यांनी केले.
विधिमंडळात आपल्यावर होणाऱ्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीवर बोलताना ते म्ङणाले, “मी कोल्हापुरात आज चोराबद्दल बोललो. पण चोरानी माझ्याबद्दल विधीमंडळात ठणाठणा बोंबलायला सुरु केली आहे. चोराला चोर म्हणायचे नाही तर काय करायचे. या चोरांना कायमचा धडा शिकवायचा आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “नारायण राणेवर घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी असल्याचा आरोप किरीट सोमय्या केला. पण आता त्यांनीच राणेला मंत्री केले आहे. सत्ताधाऱ्याकडून ईडी, सीबीआय, इन्कॅम टॅक्स या विभागाकडून विरोधी नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. पक्ष सोडा नाहीतर तुरुंगात जा असे सांगितले जात आहे. मी मरण पत्करेन पण भगवा सोडणार नाही. आज खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. 2024 साली सगळ्यांचा हिशोब होणार. शिवसेनेची गर्जना पुन्हा एकदा महाराष्ट्रात घुमणार.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापुर दौऱ्याबद्दल भाष्य करताना संजय राउत यांनी मिश्किल टिप्पणी केली. “अमित शहा कोल्हापुरात आले होते. मोगॅम्बो खुश हो के गया क्या? शिवसेनेच्या शेपटीवर तुम्ही पाय दिला आहात. तुम्ही गद्दारांच्या हातात सत्ता दिली आहे. पण लक्षात ठेवा! 2024 याची परत फेड होईल. गद्दारांच्या हातात सत्ता देताना तुम्हाला लाज वाटली नाही का? तुम्हाला मुंबई गिळायची आहे…तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस कंगाल करायचं आहे.” असे बोलून त्यांनी भाजपवर टिका केली.
भाजप- शिंदे सरकारवर हल्ला बोल करताना संजय राऊत यांनी “हिमंत असेल तर आता निवडणुका घ्या..150 जागा निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहेत. या भूमीत पुन्हा भगव्याचे राज्य आणायचंय. उद्धव ठाकरेना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय.” असे आवाहन त्यांनी शिवसैनिकाना केले.