शिवसेना बेळगाव संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांची पत्रकार परिषदेत माहिती
वार्ताहर /नंदगड
खानापूर मतदार संघासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली होती. सध्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराना पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या के. पी. पाटील यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी व म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. परंतु के. पी. पाटील यांनी आपल्या हट्टापायी उमेदवारी मागे घेतली नाही. यापुढेही त्यांनी आपला पाठिंबा म. ए. समितीला द्यावा, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांना आपण भेटणार असल्याची माहिती शिवसेना बेळगाव संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी खानापुरातील पत्रकार परिषदेत दिली. य् ाावेळी पुढे बोलताना म्हणाले, याबाबत आम्ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून के. पी. पाटील यांनी समितीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहोत. तसेच के. पी. पाटील यांच्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार आहोत. के. पी. पाटील यांना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष म्हणून अधिकृत नेमणूक नसताना ते कर्नाटक उपाध्यक्ष असल्याचे घोषित करत आहेत. खानापूर तालुका शिवसेना उपप्रमुख म्हणून दयानंद चोपडे यांची अधिकृत नेमणूक केलेली आहे. या पुढे खानापूर तालुक्यात चोपडे यांच्या सूचनेवरुनच तालुक्यात शिवसेनेचे कामकाज चालणार आहे. नागनूर यांनी खानापूर तालुक्यातील मराठी मतदाराना समितीच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचे आवाहन केले.य् ाावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर, प्रविण तेजम, महेश टंकसाळी आदी उपस्थित होते. म. ए. समितीचे खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई, उमेदवार मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे आदीनी शिवसेना अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.









