प्रतिनिधी/ रत्नागिरी
शिवसेनेत काल-परवा आलेले शिवसेना वाचवण्यासाठी बंडखोरी केल्याचे सांगत फिरत आहेत़ ज्यांना शिवसेनेत अक्कलदाढही आली नाही, त्यांनी शिवसेना म्हणजे काय ते शिकवू नय़े उदय सामंत यांनी शिवसेना वाचवण्याच्या वल्गना करू नयेत़ हिम्मत असेल तर शिवसेनेचे नाव घेण्यापेक्षा भाजपासोबत गेलात ते जाहीर कऱा तुमच्यासारख्या गद्दारांना अद्दल घडविल्याशिवाय आता शिवसेना शांत बसणार नाही, अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केल़ी
शहरातील साळवी स्टॉप येथे रत्नागिरी तालुका शिवसेनेच्यावतीने निर्धार व निष्ठावान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हेत़े यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, राजेंद महाडिक, माजी मंत्री रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष बंडय़ा उर्फ प्रदीप साळवी आदी उपस्थित हेत़े यावेळी खासदार राऊत म्हणाले की, उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत़े त्या ठिकाणीही शरद पवार यांच्याशी गद्दारी करून एबी फॉर्मसकट शिवसेनेत प्रवेश केल़ा शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणले.. आमदार केल़े चार वर्षात त्यांना म्हाडाचं पद दिल़ त्या ठिकाणी सामंत यांनी खोऱयांनी ओढल़े त्यानंतर राजन साळवींसारख्या निष्ठावान शिवसैनिकावर अन्याय करून मंत्रीपद दिल़ पण पैशासाठी तुम्ही आपले इमान विकल़े ज्या जिह्याने 6 भारतरत्न दिल़ी त्याच जिह्यात हे उपरे निपजले आहेत़ 5 हजार कोटी रूपयांनी भाजपाने आमदारांना विकत घेतल़े आमचे 40 जरी गेले असले तरी आम्ही त्याचे 100 करून दाखवू.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात राज्य सांभाळल़े मात्र भारतीय जनता पक्ष राज्यात 2 लाख लोक मरतील, अशी वाट पाहत होत़े भाजपाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आह़े कोकण कर्नाटकला जोडायचे आह़े मात्र त्यांचे हे मनसुबे कधीही सफल होणार नाहीत़ अजित पवार यांनी निधी दिला नाही, असे खोटे आरोप केले जात आहेत़ मात्र रत्नागिरी विमानतळाला साहेबांनी 100 कोटी रूपये दिल़े उदय सामंत यांना 221 कोटी रूपयांचा निधी दिल़ा तुम्ही करत असलेल्या आरोपांमागे तुमचे बोलविते धनी, हे दिल्लीचे बादशहा आहेत़ भाडखाऊ वृत्तीने तुम्ही विकले गेला आहात, असे राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेना संपवणाऱयाची जागा नरकात
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच धनुष्यबाण आपलेच असल्याचे सांगून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आह़े शिवसेना संपवणाऱयाची जागा नरकात आह़े उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेवून तुम्ही कारस्थाने केलीत़ त्या देवमाणसाचा घात केला आहात़ एकनाथ शिंदे यांचे भाषण महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे होते. असंसदीय शब्द मुख्यमंत्र्यानी विधानसभेत उच्चारल़े हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केल़ी
यावेळी बोलताना आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वर्षा बंगल्यावर बोलावून घेतल़े यावेळी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्य़ात अश्रू आपण पाहिल़े आपल्याला धोका झाला, असे शब्द साहेबांच्या तोंडून बाहेर पडल़े मात्र साहेब तुम्ही काळजी करू नका. आम्ही कडवट शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत़ आपल्यावरही शिवसेनेत अन्याय झाला, मात्र आपली निष्ठा कायमच शिवसेनेसोबत राहिली आह़े नारायण राणे सोडून गेले, तेव्हाही शिवसेनेला फरक पडला नाही, आताही पडणार नाह़ी मुंबईतून शिवसेना कोकणात वाढल़ी जुन्या शिवसैनिकांनी कोणत्याही पदाची अपेक्षा कधी ठेवली नाह़ी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार पदापर्यंत शिवसेनेने पोहचवल़े त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणे, हे आपल्या रक्तात नाही.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय बने यांनी रात्रीचा दिवस करून शिवसेना वाढवायची आहे, असे सांगितल़े तर लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, राजेंद्र महाडिक तसेच सर्व तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांची भाषणे यावेळी झाल़ी सभेला नाचणे सरपंच भैय्या भोंगले, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, प्रमोद शेरे, रोहन बने, राहूल पंडित, विलास चाळके, प्रकाश रसाळ, महेंद्र झापडेकर, बंटी कीर, उदय बने, अभय खेडेकर, राजेंद्र महाडिक, वेदा फडके, शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर, मंगेश साळवी, नंदा मोरे, नेहा माने आदी उपस्थित होत़े









