कर्नाटकात एसटी चालक आणि वाहक यांना कन्नड रक्षक वेदिकाकडून मारहाण प्रकरण
कोल्हापूर
आज (दि. २२) कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काल (दि.२१) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला.
काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर कोल्हापुरात शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन झाले. दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास मारहाण झालेले चालक आणि वाहक कोल्हापुरातील विभागीय कार्यालयात दाखल झाले. दरम्यान कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांना एकट सामोरे जात प्रवाशांची सुरक्षित ठेवल्याने शिवसेना ठाकरे च्यावतीने त्यांचा फेटा बांधून व हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात यांनी घडलेली घटना सांगितली.
एस. टीवर एस टी कर्मचाऱ्यांवर कन्नड रक्षक वेदीक संघटनेने असा हल्ला करायला नको पाहीजे होता. त्यांनी काल अर्धातरी गाडी हायवे ला थांबविली. प्रवाश्यांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अशी प्रतिक्रीया एस टी बस चालक भास्कर जाधव यांनी दिली.
भाषिक वाद असा व्हायला नको होता. यावादामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरते. या संघटनेने चित्रदूर्गच्या अलिकडे १० किलोमीटरवर बस थांबविली. ऑईलबॉण्डच्या स्प्रेनी बस च्या काचा रंगविल्या, शिवाय जिथे महाराष्ट्र लिहीले आहे, एस टी महामंडळ चा लोगो आहे त्यावर काळे फासले. एस टीच्या दारावर लाथा मारून बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर चालकांची मानसिकता पूर्णपणे खालावली. त्यानंतर त्यांना चित्रदूर्ग येथील सरकारी रुग्णालयात नेऊन उपचार केले, अशी माहिती एस टी बसचे वाहक प्रशांत थोरात यांनी दिली.








