कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयामध्ये अनेक घोटाळे बाहेर पडत आहेत. सरकारी तिजोरीवर प्रशासनातील कांही अधिकारी व कर्मचारी संगनमताने दरोडा घालत आहेत. या घोटयाळयाची चौकशी होऊन, याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. या मागणीसाठी शिवसेना उबाठाच्यावतीने सोमवारी डीन कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शिवसेना उपनेते संजय पवार व विजय देवणे यांनी सीपीआरमधील घोटाळयाचे ‘पोस्टमार्टम’ करण्यात आले. यावेळी सीपीआरमधील अधिकारी चिडीचुप बसले होते. यावेळी डीन एस.एस. मोरे, मेडिकल सुपरीटेंड शिशिर मिरगुंडे, सिव्हील सर्जन सुप्रिया देशमुख, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे निरिक्षक श्रीराम कन्हेरकर उपस्थित होते.
जिल्हयात वाढत्या स्त्री भ्रुणहत्याबाबत कडक कायदा करावा. यासाठी वापरण्यात येणारे पोर्टेबल मशिन व गर्भपाताच्या गोळया कशा उपलब्ध होतात याची झाडाझडती पवार व देवणे यांनी केली. स्त्राr भ्रुणहत्या करणाऱ्या डॉक्टरावर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट तो डॉक्टर मोकाट असून त्याचा दवाखाना सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले. आमचे हात कायद्याने बांधले असून, कारवाई करण्यामध्ये आपण हतबल असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हृदयशस्त्रक्रिया विभागाला 25 कोटी रूपये लागत असताना 52 कोटीचा खर्च दाखवण्यात आला आहे. विशाल एंटरप्राईजकडून केलेल्या औषध पुरवठयाची चौकशी व्हावी.
बनावट अंपग दाखले देणाऱ्या नागेश कांबळेची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. सीपीआरमध्ये नोकरी करणाऱ्या डॉक्टरांचे खासगी दवाखाने व कट प्रॅक्टीस सुरू असल्याचे त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे. तसेच अतिक्रमण काढणाऱ्या लोकांना सरकारी अडथळा करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच टास्क फोर्स नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी स्त्राr भ्रुणहत्येचा क्लिप दाखवण्यात आली.
यावेळी रवि चौगुले, शशिकांत बिडकरसह महीला आघाडीचे शिवसैनिक सहभागी झाले होते.
- स्त्री भ्रुणहत्याबाबत कडक कायदा करणार – मंत्री आबिटकर
संजय पवार यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आज्बटकर यांना मोबाईल लावून सीपीआरमधील घोटाळयाविषयी माहिती दिली. स्त्राr भ्रुणहत्याबाबत राज्यात नवीन कडक कायदा करणार असून, याचे काम सुरू असल्याचे मंत्री आज्बटकर यांनी संजय पवार यांना सांगितले.








