शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश हा ऐतिहासिक असून शिवसेना- भाजप या वैचारिक युतीला निलम गोऱ्हे यांनी पाठींबा दिल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये मुंबईमध्ये झाला.
यावेळी बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या कि, “मी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या विचाराने मी शिवसेनेमध्ये काम केले. पण सुप्रिम कोर्टाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अधिकृत असल्याचे सांगितले आहे.
आयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदीर, तलाक पिडीत महीलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक विचार ही भुमिका घेऊन देशात व राष्ट्रीय स्तरावर हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भुमिकेचा सन्मान करून शिंदे- फडणवीस सरकार काम करत आहे. त्यासोबतच महिला आणि वंचित घटक त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेचे मी समर्थन करत आहे. आणि त्यामुळे मी त्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेत आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी आपण वैधानिक पदावर असल्याने त्याच्या चौकटीत राहूनच हे काम करणारणअसल्याचे त्यांनी म्हटले आहे








