राजापूर :
राज्य सरकारने एसटी दरात १५ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ रद्द करावी, या मागणीसाठी राजापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राजापूर एसटी आगारासमोर आंदोलन छेडण्यात आले.
एसटी भाडेवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पक्षाच्यावतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले.








