प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri News : काही दिवसापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टारांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळें शासकीय रुग्णालयात टाळे ठोको आंदोलन शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी करण्यात आले. या आंदोलनाची शासनाकडून दखल घेऊन काही दिवसातच डॉ.सांगविलकर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे डॉक्टरविना डळमळीत झालेली रुग्णसेवा पुन्हा रुळावर येणार आहे. तोपर्यंत रुग्णालयातील प्रसूतीगृहात डॉ.सानप, डॉ. मदार व डॉ सुतार ह्यांना रुजू करून घेण्यात आले आहे. बाकीच्या समस्या लवकर सोडवण्यात येतील असे रुग्णालयाच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील समस्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी देवेंदर सिंग ह्यांच्या समवेत बैठक घेतली होती. २६ जून पर्यंत प्रसूतीगृहात काम करणारे डॉ.विनोद सांगवीलकर यांची पदउन्नती नुसार बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहमध्ये डॉक्टर नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याबाबत तात्काळ समस्या सोडविण्यासाठी मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळें सोमवारी शासकीय रुग्णालयात टाळे ठोको आंदोलन शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रत्नागिरी जिल्हा ह्यांनी करण्यात आले.त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,उप जिल्हाप्रमुख संजय साळवी,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी,शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व शिवसेना, महिला आघाडी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.









