मुंबई: राज्यातील विधान परिषद निवडणूक निकाल झाल्यानंतर शिवसेनेत दुफळी माजली आहे. शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून तीस आमदार फुटल्याची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये नगर विकास मंत्र्यांसह तीन मंत्र्यांचा समावेश असून त्यांच्यासोबत २६ आमदार शिवसेनेचे फुटलेले आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असून काँग्रेसची पक्षश्रेष्ठींची बैठक सुरू झाली आहे. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी तात्काळ दिल्लीकडे धाव घेतली आहे.
एकनाथ शिंदे हे काल रात्री पासूनच नॉटरिचेबल दाखवत होते. शिंदे यांच्यासोबत ११ आमदार गुजरातमधील सुरत इथल्या ली-मेरिडियन मध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर आज सकाळपासून शिवसेनेचे चार मंत्र्यांसह एकूण तीस आमदार शिवसेनेतून फुटले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून ठाकरे सरकार अडचणीत आलेले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी नेमकी भूमिका काय घेतील? हे दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. दरम्यान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराज देसाई गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, यांच्यासह २८ आमदार फुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांना मातोश्रीमधून आदेश निघाला आहे. प्रसारमाध्यमांशी ही कोणत्याही आमदारांनी बोलू नये, असे आदेश मातोश्रीवरून निघाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








