शिवसेना वर्धापन दिनानिमित्त जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मदत सुपूर्त
मालवण / प्रतिनिधी
दशावतार कलाकारांच्या संघटनेसाठी शिवसेनेच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सदरची मदत आज घुमडे येथील घुमडाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.दशावतार कलाकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना निर्माण होत असल्याने या संघटनेला जिल्ह्यातील सर्व सभासद सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचे काम वाढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सदरची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या मदतीने निमित्ताने दशावतार कलाकारांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.









